शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत देणार- जिल्हाधिकारी
Daily Live - शेवगाव,
नैसर्गिक आपत्ती ला सर्वच शेतकऱ्यांना बळी पडावे लागले असून खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेलच परंतु नैसर्गिक आपत्ती फंडातून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाईची मदत देणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. तर अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश शासकीय कर्मचारी यांना दिले. शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे सततच्या पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची ज्ञानेश्वर दुकळे, विठोबा महादेव दुकळे बाजरी पिक तर वसंत मसू दुकळे कापूस यांच्या शेतीत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी कधी नव्हे इतक्या प्रमाणात पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून खरीप हंगाम हातचा गेला असल्याने मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगून शासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, शेवगाव तहसीलदार विनोद भामरे, शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब कासार, विमा प्रतिनिधी विनायक पवळे, आदींसह माजी सरपंच राजेंद्र आढाव, संदीप खरड, आण्णासाहेब दुकळे , सखाराम लोखंडे, सुरज देशपांडे, हरी दुकळे, गणपत आढाव, रामनाथ आढाव आदींसह परीसरातुन शेतकरी वर्ग उपस्थित होता. शेवगाव तालुक्यातील 50 हजार 404 हेक्टर क्षेत्रातील 54 हजार 648 शेतकरी अतिवृष्टीने बाधित आहे. तालुक्यातील 70 हजार 144 शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात खरीप हंगामातील पिकांचे विमा संरक्षण रक्कम भरलेली आहे. त्यात कपाशी, मूग, बाजरी, तूर, भुईमूग आदी पिकांचा समावेश असून, 39 692 क्षेत्र विमा संरक्षित असून 4 कोटी 19 लाख 40 हजार 553 रूपये रक्कम विमा कंपनीला भरलेली आहे. त्यावर 118 कोटी 55 लाख 27 हजार विमा रक्कम पंतप्रधान फसल विमा अंतर्गत संरक्षित रक्कम विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत शेतकऱ्यांना मिळेल आशी माहिती कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी यावेळी दिली.

No comments:
Post a Comment