शेती पिकाचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

test banner

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

28 October 2019

शेती पिकाचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान

सततच्या पावसाने कपाशीतुन कोंब, बाजरी कणसाला चौर फुटला

नुकसान भरपाई देण्याची होतेय मागणी

Daily Live - शेवगाव,

दहिगाव-ने, भाविनिमगाव, सुलतानपूर बुद्रक (मठाचीवाडी), शहरटाकळी, ढोरसडे, देवटाकळी, दहिफळ, ताजनापूर, कर्हेटाकळी, घोटण आदी जायकवाडी जलाशयाच्या कडेच्या बागायती क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कपाशी बाजरी पिकावर मोठा विपरीत परिणाम झाला असून अतोनात नुकसान कपाशीचे झाले आहे. कपाशी बोंडतील उमललेल्या कापसातील बी सतत च्या पावसाने भिजुन त्या बी मधुन कोंब बाहेर पडले असून हा कापूस वेचणी योग्य राहिला नसल्याने शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला असला तरी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर जायकवाडी जलाशय काठोकाठ भरला असल्याने व सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परीसरातील ओढ्या नाल्यांना मोठे पाणी वाहून जलाशयात येत असल्याने जलाशयाच्या कडेच्या जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील जमीनित मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसुन हे पाणी वाहून जात आहे. तर परीसर पुर्णत पाणथळ बनला असुन पिके अक्षरशा सडली आहेत. कपाशी काळवंडली असून बाजरीच्या कणसाला चौर फुटला आहे.गवताने रान गच्च भरली आहे. एकंदरीत परीसराचे सततच्या पावसाने ग्रामीण जनजीवन विस्कळीत करून खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीत कशी बशी बहरलेली पिके शेवटी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे वाया गेली असुन या पिकांचे पंचनामे झाले पाहिजेत व त्वरित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे. अशी मागणी भाविनिमगाव येथील युवा शेतकरी संतोष शेळके, नवनाथ जाधव यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad


Responsive Ads Here