घुले महाविद्यालयाच्या कबड्डी संघाला चौथ्यांदा विजेतेपद - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

Post Top Ad

Post Top Ad

18 October 2019

घुले महाविद्यालयाच्या कबड्डी संघाला चौथ्यांदा विजेतेपद

सहा विद्यार्थीनीची विभागिय स्पर्धेसाठी निवड
पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोनई महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये दहिगाव-ने येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्याललच्या मुलींच्या कबड्डी संघाने दादा पाटील महाविद्यालय कर्जत संघाचा 34 गुणांनी पराभव करत सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकाविले. या विजेत्या संघातील सुवर्णा लोखंडे , स्वाती पारठे , शितल घुंगासे , छाया लकारे , दिपाली शिनकर , रूपाली नवथर या खेळाडूंची चांदवड जिल्हा नाशिक येथील के. एच. आबाड महाविद्यालयात दि. 5/6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विभागिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष .डॉ.नरेंद्रजी घुले , सचिव चंद्रशेखर घुले , उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती डॉ.क्षितिज घुले , प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एन.वाबळे, क्रीडा शिक्षक प्रा. बाळासाहेब साबळे, प्रा.अप्पासाहेब खंडागळे,प्रा.महेश शेजुळ सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, सेवा सोसायटी अध्यक्ष शब्बीरभाई शेख, उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड, सदस्य भरत घोडके, पंचायत समिती अधिकारी रामकिसन जाधव, भाविनिमगाव सरपंच पांडुरंग मरकड, सेवा सोसायटी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर मरकड, पत्रकार अशोक वाघ आदींसह पालक वर्गातुन खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad