शहरटाकळी विद्यालयात कॉ. आबासाहेब काकडे पुण्यस्मरण कार्यक्रम
स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, राजकीय आणि संघर्षशील जीवन प्रवासात साक्षर समाज घडवण्याचे आदर्श काम काॅ. आबासाहेब काकडे यांनी केले. भविष्यातील शैक्षणिक विकासासाठी संस्था विकास हेच ध्येय ठेवून ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने वंचित बहुजन समाजाला शैक्षणिक सुविधा पुरवणारे काॅ. आबासाहेब हे एक शिक्षण प्रसारकच होते असे प्रतिपादन एफ डि एल शिक्षण संस्थेचे जेष्ठ शिक्षक प्रा. गोरक्ष पुजारी यांनी केले.
स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, राजकीय आणि संघर्षशील जीवन प्रवासात साक्षर समाज घडवण्याचे आदर्श काम काॅ. आबासाहेब काकडे यांनी केले. भविष्यातील शैक्षणिक विकासासाठी संस्था विकास हेच ध्येय ठेवून ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने वंचित बहुजन समाजाला शैक्षणिक सुविधा पुरवणारे काॅ. आबासाहेब हे एक शिक्षण प्रसारकच होते असे प्रतिपादन एफ डि एल शिक्षण संस्थेचे जेष्ठ शिक्षक प्रा. गोरक्ष पुजारी यांनी केले.
सोमवार, दि.९ रोजी शेवगाव तालुक्यातील आंत्रे येथील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कॉ. आबासाहेब काकडे यांचा 41 वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला. याावेळी मार्गदर्शन करतानाा पुजारी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काॅ. काकडे यांच्या प्रतिमेल मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक परशुराम नेहूल यांनी केले.तर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्रा. शशिकांत काकडे, रवींद्र मडके, सुभाष बरबडे, महेश भालेराव, प्राचार्य. विनायक झिरपे, भिंगारे भाऊसाहेब यांनी कॉ. आबासाहेब काकडे यांच्या जीवनावर भाष्य केले. कॉ. काकडे यांच्या जन्मशताब्दी वर्षा व 41 व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त विद्यालयात चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, कबड्डी, खो-खो आदी प्रोत्साहनपर स्पर्धांचे आयोजनात विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक विजेते काढण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तीपत्र देवून या विजयी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी सुर्यकांत गवळी, बाळासाहेब ठोंबळ, महेश भालेराव,प्रा उत्तम निकाळजे, रामकृष्ण गोरे, भिंगारे भाऊसाहेब, सुभाष बरबडे, रवींद्र मडके, मनोज घोंगडे, ज्ञानदेव खराडे, सौ. विमल पाटेकर, विद्यालयाचे प्राचार्य. विनायक झिरपे, सुरेखा शेलार, शितलकुमार गोरे, रवींद्र मडके, अलका भिसे, रेखा आढाव आदींसह
विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ईश्वर वाबळे यांनी केले तर प्रा. सहदेव साळवे यांनी आभार व्यक्त केले.
काॅ. आबासाहेब काकडे यांच्या जन्म शताब्दी सोहळया निमित्त आणि पुण्यस्मरण दिनानिमित्त शहरटाकळी विद्यालयात विविध गुण दर्शक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य. विनायक झिरपे, शिक्षक सुरेखा शेलार, शितलकुमार गोरे, रवींद्र मडके, अलका भिसे, रेखा आढाव यांनी परिश्रम घेतले तर विजेते विद्यार्थी नावे खालील प्रमाणे.
चित्रकला स्पर्धा प्रथम चार क्रमांकाचे विद्यार्थी
1.शिवम चंद्रभान कानडे-8 वी –ब,
2.ज्योती दिनकर मोटे-7 वी- अ ,
3.श्रेयश बाळासाहेब घनवट- 6 वी- ब ,
4.प्राची शिवाजी मुके, 5 वी-ब .
रांगोळी स्पर्धा प्रथम तीन क्रमांकाचे विद्यर्थी विद्यार्थी
1. प्रिया रावसाहेब सिरसट- 7 वी- ब,
2. वैष्णवी बंडू नाबदे- 8 वी- ब,
3. दुर्वा विलास काकडे- 7 वी- ब,
मेहंदी स्पर्धा प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी
1. सिद्धी गणेश खंबरे- 8 वी- ब,
2. पूजा अंबादास लोढे - 8 वी- ब,
3. सिद्धी गणेश माताडे - 7 वी- ब,
2. पूजा अंबादास लोढे - 8 वी- ब,
3. सिद्धी गणेश माताडे - 7 वी- ब,
वक्तृत्व स्पर्धा प्रथम तीनक्रमांकाचे विद्यार्थी
1. पवार वैभव संतोष - 8 वी- ब,
2. साबळे प्रणव संतोष - 8 वी- ब,
3. रोकडे वैष्णवी बंडू - 8 वी- ब,
कबड्डी स्पर्धा मुले प्रथम विजेता संघ विद्यार्थी.
गौरव गोविंद मुंगसे ,गौरव ज्ञानेश्वर एरंडे, श्रीनाथ रामहरी जाधव, शुभम दामोधर मुंगसे, आदित्य दादासाहेब गादे, अभिषेक दत्तात्रय ठोंबळ, तुषार शिवाजी गवळी, सत्यम ज्ञानेश्वर मिसाळ, सुरज शिवाजी खरड.,
खो-खो स्पर्धा मुली प्रथम विजेता संघ विद्यार्थी
सिद्धी शंकर गादे, गीतांजली गणेश गवळी, प्रिया रावसाहेब सिरसट, समीक्षा सागर उंदरे, शिवकन्या एकनाथ मडके , ऋतुजा तुकाराम एरंडे, कोमल पांडुरंग मुंगसे, आरती अशोक देशमुख , साक्षी योगेश ओहळ.
अशोक वाघ - शेवगाव
No comments:
Post a Comment