अध्यापकांनी सर्जनशील विचार विद्यार्थ्यात रुजवावेत. - प्रा. संतोष तागड - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

Post Top Ad

Post Top Ad

15 October 2019

अध्यापकांनी सर्जनशील विचार विद्यार्थ्यात रुजवावेत. - प्रा. संतोष तागड

डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस निमित्त प्रा. संतोष तागड यांचे विचार..डेली लाईव्ह - नेवासा

 डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे या दिवशी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन संस्कृती जोपासली जावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अर्थात व्हाट्सअप फेसबुक यांच्या अतिवापराने ग्रंथप्रेम असलेली माणसे कमी झाले आहेत. टाॅलस्टाॅयचे साहित्य महात्मा गांधी यांनी वाचले नसते, थॉमस पेन यांचे ' राइट्स ऑफ मॅन' हे बुक महात्मा फुले यांनी वाचले नसते तर महाराष्ट्राच्या समाजकारणाला वेगळी दिशा प्राप्त झाली नसतीच. प्लेटो,अरिस्टॉटल ,कार्ल मार्क्स, आंबेडकर, रुसो ,व्हॉल्टेअर महान विचारवंत साहित्यप्रेरनेने घडले आहेत. परंतु या देशाच्या वाचन संस्कृतीचा विचार केला असता शोक व्यक्त करण्याची भावना निर्माण झालेली दिसते. शहरासह खेड्यातील मोठमोठी ग्रंथालये ओस पडली आहेत. धुळीने माखलेल्या पुस्तकांची कैफियत वर्षानुवर्षे बेपर्वाईची ठरते. वाचनप्रेमी कमी झाल्याने बऱ्याच प्रकाशन संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती ,भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन (15 आक्टो.)म्हणून साजरा करताना किमान दहा पाने तरी आपण वाचली पाहिजेेत. आणि वर्षातून किमान एखादे दुसरे पुस्तके खरेदी केले पाहिजेत. शाळा महाविद्यालयात वाचनाचे महत्त्व विषद करायला हवेत. अध्यापकांनी संदर्भ साहित्य चाळलेच पाहिजेत. मेरी सुनो.. म्हणून तेच ते न रुजवता अध्यापक ंसर्जनशील विचार विद्यार्थ्यात रुजवावेत. मराठी साहित्य आणि इतर परभाषिक साहित्याची भाषांतरे सामाजिक बांधिलकी मान्य करत असतात.

No comments:

Post a Comment

Post Top Ad