म्हणून शेतकरी व्यस्त आहे... - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

Post Top Ad

Post Top Ad

14 October 2019

म्हणून शेतकरी व्यस्त आहे...

कपाशी वेचणीला, बाजरी काढणीला,  तर ऊस,  कांदा लागवडीला वेग

पावसाळ्यातील मध्यावधीनंतर बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, हि पिके कशी बशी तरूण बऱ्यापैकी बहरली त्या पिकाची  आज बर्‍याच ठिकाणी बाजरी काढणीला तर कपाशी वेचणीला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी अपुऱ्या पावसाअभावी खरिपाची पेरणीच झाली नाही असे मोकळे क्षेत्र गवताळ बनले होते. 

ते रान आता रब्बी हंगामातील पिक घेण्यासाठी त्याव र शेतकऱ्याकडुन मशागत सुरू झाली आहे.  तर अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील मुख्य पिक असलेल्या कांदा व ऊस लागवडीला सुरवात झाली असून जायकवाडी जलाशयाच्या कडेचा बागायती परीसरात शेेेेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव, दहिगाव-ने,  शहरटाकळी, ढोरसडे, देवटाकळी, दहिफळ, ताजनापूर, कर्हेटाकळी,  घोटण आदी गावातील रब्बी हंगामातील पिक लागवड वेगात सुरू झाली आहे. तर कांदा रोपे तयार केले असल्याने कांदा लागवडीला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी उन्हाळ्यातील लागवडीसाठी कांदा  रोपे तयार करण्यात  बि टाकण्यात  येत आहे. असे युवा शेतकरी संंभाजी गवळी यांनी सांगितले. पाणी   उपलब्धतेच्या आधारे जायकवाडी जलाशयाच्या परीसरातील शेतीवर यंदा ऊस  लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. यंंदा मात्र  कारखाना गळीत हंगामावर  ऊस कमतरतेचा परिणाम होणार अहे. या वेळी ही 265 या उत्तम वाढ होत असलेल्या जातीची च लागवड जास्त  प्रमाणात होत असल्याचे युवा शेतकरी महेश आमले यांनी सांगितले. ठिबक सिंचन चा वापर शेतकरी  करताना दिसत आहेत. बाजरी  पिकावर  केसाच्या व इतर आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे कपाशी पिकावर  बोंड आळी व लष्कर आळी न हल्ला केल्याने कपाशी  पिक यंदा तोट्याचे ठरत आहे . यंदा दुष्काळात चार्‍याची झालेली टंचाई लक्षात घेऊन शेतकरी चारा पिके घेणेे लाही प्राधान्य देत असल्याचे शहरटाकळी येथील शिवाजी खराडे यांनी माहिती दिली आहे. परतीच्या प्रवासाला निघालेेल्या मान्सूनने बऱ्यापैकी हजेरी लावली असल्याने जिरायत भागात  ज्वारी हरबरा  पिके शेतकऱ्यांनी वाफशावर पेरणी केली  अनेक ठिकाणी हि पिके ताशी लागली आहे. एकुणच शेतकरी खरीप काढणीला तर रब्बी हंगाम तयारीत  व्यस्त  असल्याचे दिसून येते आहे.. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad