विषाणू मुळे होणारा आजार धोकादायक ठरू शकतो - डॉ. कानडे. - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

test banner

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

16 October 2019

विषाणू मुळे होणारा आजार धोकादायक ठरू शकतो - डॉ. कानडे.

देवटाकळी जिजामाता विद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रम.,

प्लाज्मोडीयम विवियाक्स पी. विवियाक्स, प्लाज्मोडीयम मलेरीई पी. मलेरीई आणि प्लाज्मोडीयम ओव्हेल पी. ओव्हेल या विषाणूंमुळे होणारा हिवताप हा परजीवी आजार धोकादायक ठरू शकतो असे प्रतिपादन दहिगाव ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातचे वैैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी केले .शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात हिवताप निवारण व डासां पासून होणाऱ्या गंभीर आजारावर ते शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव मडके, शिक्षक नानासाहेब काटे, महादेव मासाळकर, रावसाहेब घनवट, सुधाकर उगले, प्रकाश उगलमुगले, अमोल लोखंडे, आबासाहेब वाघमारे, बाळासाहेब उगले,रघुनाथ पटारे, जयकिशन वाघ उपस्थित होते. यावेळी सविस्तर माहिती देताना डॉ. कानडे म्हणाले की मानवी घरांमधे आणि पाळीव प्राण्यांच्या गोठ्यात दिवसा विश्रांती घेणारा हा विषाणू मोसमी पाऊस झाल्यानंतर मोठ्या संख्येने पावसाचं साठलेलं पाणी आणि छोटी तळी, चर, नदीच्या पाण्याची डबकी, कालवे, गळणारे पाणी, विहीरी, तलावांच्या कडेला, साठलेले झरे.या ठिकाणी वाढतात. या कीटकाच्या चावण्याची वेळ ही त्यांच्या अनुवांशिक गुणधर्मानुसार ठरते, परंतु वातारणाच्या स्थितीचा त्याच्यावर तत्काळ प्रभाव पडत असल्याने बहुतांश कीटक, संध्याकाळ झाली की लगेच चावायला सुरुवात करतात. त्यामुळे, हिवाळ्यात तुलनेनं ते लवकर चावायला सुरुवात करतात त्यांचा सर्वाधिक चावण्याचा काळ हा प्रजातींनुसार वेगवेगळा असतो तेव्हा परीसर स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. शााळेत सस्य स्थिती वाातावरण व मानवी जीवन यावर आधारित शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आभार प्रा. महादेव मासाळकर यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad


Responsive Ads Here