काकड आरती भक्तीचा पहाट जागर - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

test banner

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

28 October 2019

काकड आरती भक्तीचा पहाट जागर

शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील काकडा महोत्सव एक परंपरा

Daily Live - शेवगाव ,
नवरात्रोत्सव आदिशक्ती चा जागर होणारा सर्वाधिक कालावधी. या नऊ दिवसाच्या भक्ती रसाने नागरिकांना नवचेतना मिळत असते . अशा या नवरात्रोत्सवाची प्रत्येक दिवसाची सुरवात हि भल्या पहाटे 'उठा सकल जन प्रभात समयो जाहला ' या भूपाळीने काकड आरती सुरू होते त्यामुळे काकड आरती ला विशेष महत्त्व प्राप्त आहे.खडी नवरात्रोत्सव व काकडा महोत्सव येथील परंपरागत धार्मिक कार्यक्रम असुन अशाच अर्धशतक पार केलेल्या भाविनिमगाव येथील जगदंबा माता मंदिरातील परंपरागत काकडा महोत्सव अखंडित 54 वर्षापासून सुरु आहे .जवळपास दिडशे स्त्री पुरुष एकत्र येऊन रोज पहाटे चार वाजता या सामुदायिक काकड आरती ला हजर असतात. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवा नंतरही एक महिना सुरू राहणारा हा काकड आरती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आदरणीय गुरूवर्य विठ्ठलनाथ महाराज यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या महोत्सवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. आज अर्ध शतक पार केलेल्या या महोत्सवाने गावातील लहान, थोर, नवयुवकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. भाविनिमगाव येथील जगदंबा माता एक जागृत देवस्थान असुन स्वातंत्र्य्योत्तर काळात येथील पशुहत्या बंदी नंतर अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबविण्यात आले त्यातीलच नवरात्रोत्सव आणि सव्वा महीना चालणारा काकडा महोत्सव हे दोन प्रमुख धार्मिक कार्यक्रम बनले. आदरणीय कबीर बाबा व गुरूवर्य विठ्ठलनाथ महाराज यांच्या वास्तव्याने व जगदंबा माता या जागृत देवस्थान मुळे गावचे वैभव व महती वाढली असून येथील जगदंबा माता भजनी मंडळ व वारकरी संप्रदाय यांचे उत्तम संघटनाने गावातील कार्यक्रम जगदंबा माता मंदिरा ट्रस्ट च्या सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडतात. घटस्थाापने पासून सुरू होणाऱ्या या काकड महोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. या दिवशी पहाटे चार वाजता सांगते निमित्त हरी कीर्तन आयोजित करण्यात येऊन सव्वा महीना चालणारा काकडा महोत्सव समााप्ती केली जाते.
काकड आरती चेतनामयी धार्मिक कार्यक्रम
येथील जगदंबा माता मंदिरातील काकड महोत्सव भक्तीचा एक पारंपारीक, जागर रूपी एक चेतनामयी धार्मिक कार्यक्रम असुन पंचक्रोशीतील भाविकांनी या काकड महोत्सवा पासून प्रेरणा घेऊन आसपासच्या गावातही मंदिरात काकड आरती घेतली जाते. नवयुवक, महिला-पुरुष भाविकांमध्ये या काकड उत्सवाचे आकर्षण असून दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा घटस्थापना ते त्रिपुरारी पौर्णिमा या दरम्यान साजरा केला जातो.

अंकुश शिंदे - सदस्य, जगदंबा भजनी मंडळ भाविनिमगाव..

No comments:

Post a Comment

Post Top Ad


Responsive Ads Here