शेती विकासाशिवाय ग्रामिण विकास अशक्य - प्राचार्य डॉ. कुंदे. - Daily Live

Breaking

letest news, Tec news, health, social, agriculture, political , smartphone, blogger news, lifestyle, cooking, gaming, food, fashion, festivals, electronics, movies,

Post Top Ad

Post Top Ad

04 October 2019

शेती विकासाशिवाय ग्रामिण विकास अशक्य - प्राचार्य डॉ. कुंदे.

शेवगाव  न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये  महात्मा गांधी व   लालबहादूर शास्री यांच्या जयंती निमीत्त जलश्रोत स्वच्छता,  अभियान पार पडले 


महात्मा गांधींनी खेडयाकडे चला हा संदेश दिला या तत्वाचे काटेकोरपणे पालन झाले असते तर आज भारताकडे जगाने विकसित देश म्हणून पाहिले असते परंतु प्रत्यक्षात झाले उलटेच आपली ध्येय धोरणे अशी राहिली की , खेडयाकडून शहराकडे चला. त्यामुळे आज शहरांमध्ये मोठया प्रमाणावर ग्रामिण भागाकडून स्थलांतर घडून येत आहे. 

परिणामी शहरी भागात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, वाहतूक इ. मुलभूत सोयी सुविधांवर ताण पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. दुसरीकडे खेडी ओस पडत चालली आहेत. आज मितीला खेडयांचे रूपांतर शहरात   व्हायला हवे आणि शहरांकडून ग्रामिण भारताकडे जर लोकांचे स्थलांतर होईल अशाप्रकारची आपली विकासाची ध्येय धोरणे निश्चित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण होऊन नागरी समस्यांची तिव्रता कमी होण्यास मदत होईल. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला परंतू आजमितीला अन्नसुरक्षितता या गोंडस नावाखाली देशातील अन्नदात्याची वर्षानुवर्ष आर्थिक लूट सुरूच आहे. 

या निमित्ताने आपला देश लाखोंच्या  पोशिंदयाला आणखी किती दिवस लुटणार आहे? असा प्रश्न उपस्थित करावा वाटतो.जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत शेती विकास अशक्य आहे आणि शेती विकासाशिवाय ग्रामिण विकास शक्य नसल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. कुंदे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे
न्यू आर्टस्, कॉमर्स & सायन्स कॉलेज शेवगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २ ऑक्टो . २०१९ रोजी  महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त या दोन्ही महापुरुष प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कुंदे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी  स्वच्छता हीच सेवा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शेवगाव शहरातील शास्त्रीनगर  परिसरातील जलश्रोत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत विहिरी भोवतालचा कचरा, प्लॅस्टिक, जमा करून तेथील स्वच्छता केली. 

तसेच महाविदयालय परिसरातील गवत काढून आणि प्लॅस्टिक गोळा करून वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.कुंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एन.मिरे, प्रा. मंगेश राहिंज, ग्रथपाल मीनाक्षी चक्रे,
राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा.एन.एस.गोरे, डॉ. रवींद्र वैद्य, प्रा. के.डी.कांबळे, डॉ. वसंत शेंडगे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी मनोज टेकुळे, अंजुम शेख, पाथरकर शैलेश आणि NSS चे स्वयंसेविका/स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.कुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रा. एस.एन. मिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad